🦜 *पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; पिकांवरील रोगांचे वाढले प्रमाण.* 🌾🌱
╭══════════════╮
*_[]👨🏻🌾शेतकऱ्यांचा मित्र👨🏻🌾[]_*
╰══════════════╯
👉🏼 *पक्ष्यांचे अस्तित्व संपणे मानवासाठी ठरतंय धोकादायक*
👉🏼 *ध्वनी प्रदुषणामुळे अनेक पक्षी होताहेत गत:प्राण*
_| निसर्गाच्या हिरवळीत, अंगणातील झाडांवर पहाटेच्या प्रहरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासारखा अन् पाहण्यासारखा होता. गेल्या दशकातलं हे चित्र आज मात्र दुर्मिळ झालं आहे. पक्षांचे थवे च्या थवे दिसणारं आकाश आज पांढरशुभ्र दिसत असुन वेगवेगळ्या कारणांमुळे पक्षी गतप्राण होताना दिसत आहे. दरम्यान निसर्गातील किडे - मुंग्या खावुन उपजीविका करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत या दशकात लक्षणीय घट झाल्याने पिकांवरील रोगांचे प्रमाण वाढले असल्याचे भयानक वास्तव असुन पक्ष्यांची संपणारे अस्त्तित्व मानवासाठी घातक ठरत असल्याचं धक्कादायक वास्तव आहे._
_आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. या युगात मानवनिर्मित नवनवीन शोध लागल्याने जगाची प्रगती झाली, परिणामी अवघं जग मानसाच्या मुठीत आलं अन् बोटाच्या इशाऱ्यावर नाचु लागलं. मात्र हे होत असताना निसर्गाची प्रचंड हानी होवु लागली. सिमेंटची जंगलं, महामार्गाची निर्मिती,_ _उद्योग-व्यवसाय-कारखानदारी, मेट्रो उभारण्यासाठी उभ्या वृक्षांवर कुऱ्हाडी कोसळल्या. अर्थात या नवनिमिर्तीसाठी वृक्षांच्या कत्तली झाल्या पण त्याचबरोबर त्या झाडांवर असलेल्या हजारो-लाखो पक्षांची घरे अन् कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मानवाच्या प्रगतीत चिमुकले जीव धारातीर्थी पडले._
_शिवाय वाढत्या ध्वनीप्रदूषण आणि मोबाईल रेंज नेटवर्कमुळे हृदयविकाराच्या धक्क्यांमुळे पक्षी व त्यांची अनेक पिले गतप्राण झाली आहेत._
_दरम्यान पक्ष्यांच्या मरणामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढले आहे._ _*गेल्या दशकात काळ्या शिवाराची नांगरणी करताना पाच - पन्नास बगळे बैलजोड्यांच्या मागे फिरायचे. म्हणजेच जमिनीतील मातीची उलथापालथ झाल्यावर मातीतील किडे, अळ्या, कृमी वर येत असत अन् बगळे लगेच अचूक टायमिंग आधुन त्याला भक्ष्य बनवत असत. पिकांवरील अळ्या सुद्धा पक्षी अचुक टिपत असत. मात्र आज जमिनीखाली असलेली 'हुमणी' आणि पिकांवर आलेली 'लष्करी' अळी फक्त पक्ष्यांच्या कमतरतेमुळे पैदास झाली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.*_ _अर्थात पक्ष्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय घट मुळे पिकांचे आरोग्य धोक्यात आले. पिकांच्या आरोग्यासाठी फवारण्या होवु लागल्या अन् या फवारण्यांमुळे उरल्यासुरल्या पक्ष्यांचे व मानवाचे आरोग्य शेवटच्या घटका मोजु लागलंय एवढं मात्र निश्चित._
🦚 *पक्षी मरण्याची ही आहेत कारणे :-* 😔
▫ *झाडांच्या कत्तली होवु लागल्या.*
▫ *पक्ष्यांची घरे उद्ध्वस्त होवु लागली.*
▫ *पतंगीच्या मांझ्यात अनेक पक्षी अडकु लागले.*
▫ *लग्नसमारंभ, वाढदिवस, शाखा उद्घाटन अशा कारणांमुळे 'फटाके' व 'D J लावल्याने ध्वनीप्रदूषण वाढले त्यामुळे अनेक पक्षांना हृदयविकाराचा झटका येवु लागला.*
▫ *मोबाईल नेटवर्क रेंजर्स मुळे वायुलहरीतुन कंप पावल्याचा त्रास पक्ष्यांना झाला.*
▫ *पिण्यासाठी पाणी नसल्याने व दुषित पाणी पिल्याने.*
▫ *खाद्य न मिळाल्याने व विषारी खाद्य खाल्ल्याने.*
▫ *पिकांवरील वाढत्या फवारण्या अन् फवारण्या केलेले धान्य, फळे खाल्ल्याने.*
🦚 *अंगण, झाडं, कट्टा घाण करतात म्हणून लोकांनी हटावासाठी केलेले सापळे.*
🦜 *पक्षी जगविण्यासाठी हे अवश्य करा.* ☺
🌱 *कोणत्याच कार्यक्रमात आवाज काढणारे फटाके वाजवु नका.*
🌱 *पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय करा.*
🌱 *पक्ष्यांना खाद्य म्हणून गहु, ज्वारी, तांदुळ ही धान्ये टाका.*
🌱 *झाड - वृक्ष यांच्या कत्तली थांबवा.*
🌱 *पतंग उडविण्यासाठी मऊ दोऱ्याचा वापर करा.*
👉🏼 *भविष्य अंधकारमय आहे.*
_- गेल्या दशकात पक्षी असल्याने रोगराई नव्हतीच. त्यावेळी हुमणी, लष्करी अळी नव्हती. आज दोन्ही अळ्या शेतकऱ्यांना हैराण करुन सोडत आहेत. याला मानवच जबाबदार आहे. बगळे घाण करतात म्हणून त्यांना उठविण्यासाठी अनेक झाडांवर घंटा बांधल्या होत्या तीच झाडे आज पक्ष्याविना ओस पडली आहेत. हे चित्र असेक्ज राहिले तर मानसाचे भविष्य अंधकारमय असणार आहे, त्यामुळे निसर्गाच्या बाबतीत मानसाने वेळेवरच सावध झाले पाहिजे._
*_शेती तसेच विश्वातील कोणतीही माहिती मिळवा तुमच्या व्हाट्सअप वर तेही अगदी मोफत, शेतकऱ्यांचा मित्र जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👉🏻 https://bit.ly/2Pd6IAb_*
No comments:
Post a Comment